Sunday, December 22, 2024
अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. ज्या नातेवाईकांनी आपल्याला कठीण समयी मदत केली असेल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हे छोटेसे भावप्रदर्शनदेखील त्यांचा उत्साह वाढवू शकते. कृतज्ञता ही आयुष्याची खुमारी वाढवणारी असते आणि उपकार न मानणे हा दोष असतो. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणा-या लोकांना तुम्ही वचन द्यााल.